अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्या मधील लिंगदेव या गावाची जुनी ओळख खडकवाडी या नावाने असून या मागील इतिहास असा आहे. की पांडवांनी या ठिकाणी श्री लिंगेश्वर व खडकेश्वर देवस्थान (५ शिवलिंग एकत्रित पिंड) स्थापित केले होते. खडकेश्वर देवस्थानच्या नावावरून या गावात जुने नाव खडकवाडी असे होते. गावास ऐतिहासिक पौराणिक महत्त्व प्राप्त असलेले देवस्थान म्हणजे लिंगेश्वर महादेव देवस्थान हे आहे. या देवस्थान बाबतचा ऐतिहासिक माहिती अशी की हे देवस्थान पांडवकालीन असून ,सन:- १६२५ ते १६६४ या काळात शहाजीराजे हे पेमा देवीच्या किल्ल्यावरून शिवनेरी किल्ल्याकडे जाताना श्री लिंगेश्वर महादेव देवस्थानचे दर्शन घेतल्याशिवाय जात नसत. त्या काळात शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प हा प्रथम श्री लिंगेश्वर महादेव देवस्थान मंदिरात केला होता. या प्रयत्नाला जरी यश त्याकाळी आले नसले तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी वडिलांच्या या प्रयत्नापासून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मात्र घेतली व छत्रपती शिवाजी राजे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात यशस्वी झाले.
श्री लिंगेश्वर महादेव देवस्थान तीर्थक्षेत्र हे खूप पुरातन असून या देवस्थानास अनन्य साधारण महत्त्व आहे. या देवस्थानच्या मंदिराचा जिर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी इ.स सन:-१७७५ ते १७९० या कालखंडामध्ये करण्यात आलेला आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्याच कालावधीमध्ये या गावाच्या कडेला असलेला खोल वाहळ नाला या ठिकाणी पिण्याचे पाण्याकरिता बारव खोदकाम करून बांधकाम करून दिलेली आहे. श्री भगवान लिंगेश्वर महादेव हे स्वयंभू व अपरिमीत असे जागृत व जाज्वल्य देवस्थान आहे या बाबत इथे येणाऱ्या अनेक भाविकांना अनुभव आलेले आहेत.
या देवस्थानची वर्षातून एकदा गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा भरत असते. या यात्रेच्या दिवसी रात्री आखाडी असते. या यात्रेच्या आखाडी मध्ये रामायण महाभारत यामधील पात्र वेशभूषा धारण करून नाचविली जातात सदर पात्रांचा देवस्थानच्या सभेमध्ये गाव स्तरावर लिलाव बोली लावून हे पात्र साकार करण्यासाठी नाचविण्यासाठी बोली लावली जाते. साधारणपणे ही बोली ११०००/- पासून पुढे ते १५१०००/- पर्यंत जाते या बोलीतून देवस्थानास दरवर्षी साधारणपणे १५ ते १८ लाख रुपये उत्पन्न मिळते.हे देवस्थान या पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून मानले जाते.
ग्रामपंचायत लिंगदेव

ग्रामपंचायतीची स्थापना , भौगोलिक क्षेत्रफळ व सांख्यिकी माहिती

घटक लोकसंख्या
ग्रामपंचायतीची स्थापना दिनांक व भौगोलिक क्षेत्रफळ
दि २८/०३/१९५६
सन २०११ जनगणनेनुसार लोकसंख्या व सांकेतांक क्रं.
लिंगदेव- ५५७२६६ , ठाकरवाडी-५५७२६४
GST NO/TAN NO/PAN NO
27AABLG3643CIDQ / AABLG36423C
ग्रा.प.चा ई-मेल आयडी
lingdevgp6642@gmail.com
ग्रामपंचायतिची सार्वत्रिक निवडणूक दिनांक
१५/0१/२०२१
सरपंच निवडणूक दिनांक
०९/0२/२०२१
सरपंचाचे नाव व भ्रमणध्वनी
श्री:-अमित राणू घोमल – ७९८१७५२१६८
ग्रा.से/ ग्रा.वि.अ. नाव व भ्रमणध्वनी
श्री. आर.सी.पावसे (९८५०२२९०८९)
नेमणूक दिनांक
२३/०३ /२०२३
अतिरिक्त सजा असेल तर सजेचे नाव व कामाचे वार
मुख्य सजा- लिंगदेव
ग्रामपंचायत सदस्य संख्या
११
आकृतीबंधानुसार मंजुर कर्मचारी संख्या
०३
प्रत्यक्ष कार्यरत कर्मचारी संख्या
०३
एकूण लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

लिंगदेव गावाची लोकसंख्या सांख्यिकी माहिती

खालील तक्त्यामध्ये लिंगदेव गावातील एकूण लोकसंख्या, बालकांची संख्या, अनुसूचित जाती व जमातींची माहिती तसेच साक्षर व निरक्षर नागरिकांची तपशीलवार आकडेवारी सादर करण्यात आली आहे. ही माहिती गावाच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीचे प्रतिबिंब दर्शविते.

घटक लोकसंख्या
अनु जाती लोकसंख्या
१८०
अनु जमाती लोकसंख्या
६७०
कुटुंब संख्या
६९७
अनु जाती कुटुंब संख्या
५०
अनु जमाती कुटुंब संख्या
१४०
बी.पी.एल कुटुंब संख्या
४०३+२८ (४३१)